Barnes & Noble (DEV)
kayapalata
kayapalata
Couldn't load pickup availability
‘कायापालट’ ही ओडिशात चिल्का या नयनरम्य सरोवराच्या किना-यावरील खेड्यातील, वात्रट व बेजबाबदार पण नंतर गोर-गरिबांचा डॉक्टर म्हणून प्रसिद्ध झालेल्या डॉ. विशाल पटनाईकची कथा. ज्योती महापात्रा ही साधी, देवभोळी व सतत हाती गीतेचा ग्रंथ बाळगणारी, दैवगतीवर विलक्षण विश्वास असणारी, म्हणून सर्वांनाच विचित्र हास्यास्पदही वाटणारी मुलगी. तिचे वडील प्रा. सनातन महापात्रा हेही विशालसहितच्या टारगट मुलांच्या दृष्टीने विचित्र म्हणूनच लहानपणींच्या खोड्यांचे टार्गेट.
पिग्मेलिअन या जगप्रसिद्ध शिल्पकाराच्या मिथकावरील त्यांनीच लिहिलेल्या नाटकात प्रसंगवशात विशाललाच पिग्मेलिअनची भूमिका करावी लागते. गॅलेटिया बनते ज्योती. येथून कादंबरी विलक्षण वळणे घेत पुढे सरकते. पिग्मेलियनच्या अजरामर प्रीतीमुळे त्याने बनविलेल्या निर्जीव पुतळ्याचा कायापालट होऊन तो सजीव होतो. हा मिथकात्मक शारीरिक ‘कायापालट’ इथे अत्यंत वेगळ्या अर्थाने दर्शविला गेल्याने संपूर्ण कथानकात अनेकांचा वेगवेगळा ‘कायापालट’ होतो.
भग्वद्गीताही या कादंबरीत एका प्रतीकासारखी अवतरते. ज्योतीच्या हातातील ‘गीता’ तिला (आणि गीतेलाही) हास्यास्पद ठरवत असतानाच ते प्रयोजन सहेतूक आहे याची जाण वाचकाला करून दिली जाते. त्याच वेळेस पिग्मेलिअनचे मिथक, अजरामर असले तरी ते शारीर...आणि गीता हे अशारीर अमरतेचे प्रतीक म्हणून इथे वापरले गेले आहे.
विलक्षण शब्दचित्रप्रवास करीत वरकरणी साध्यासुध्या वाटणा-या कथेची नाळ मानवाच्या चीरवेदनांशी येऊन ठेपली असल्याने ही कादंबरी वाचकांना प्रगल्भ करण्यास निश्चित मदत करेल.
Share
