Skip to product information
1 of 1

Barnes & Noble (DEV)

ajnatavasa

ajnatavasa

Regular price $4.95 USD
Regular price Sale price $4.95 USD
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

दुर्दैवाच्या फे-यात अडकल्यामुळे आपला व्यवसाय, शहर व घर सोडलेली व जगापासून दूर राहण्यासाठी स्वत:भोवती अनामिकतेचा कोष विणलेली एक व्यक्ती दूरच्या शहरी एका अनाम गल्लीतील भाड्याच्या खोलीत आपला ’अज्ञातवास’ शांततेत व्यतीत करण्यासाठी येते. व्यक्तीच्या अनामिकतेविषयी गल्लीला काही माहीत नसते वा त्याविषयी देणे-घेणेही नसते. पण गल्लीतील साहचर्य तसेच एकमेकांच्या गोष्टीत नाक खुपसण्याच्या मोकळ्या ढाकळ्या वातावरणामुळे ती व्यक्ती त्या गल्लीच्या चैतन्यपूर्ण जीवनप्रवाहात नकळतच ओढली जाते. इतरांच्या मदतीस सदैव तत्पर असलेली ती व्यक्ती गल्लीतील काहींच्या जीवनात महत्वाची भूमिका निभावते तर काहींच्या प्रेमाला पात्र होते.
अज्ञातवासाचे दिवस असे सरत असतानाच असे काही प्रसंग घडतात की त्या व्यक्तीची खरी ओळख पुढे येते. गल्ली आता त्या व्यक्तीवर प्रेम करू लागलेली असतानाच ती पुन्हा आपल्या पूर्वजगात जाण्याचा निर्णय घेते. कोण असते ती व्यक्ती व काय असते तिची ओळख? आणि काय असते कारण, ज्यामुळे ती व्यक्ती ‘अज्ञातवास’ कंठीत असते?
काहीही सनसनाटी न घडणा-या त्या शांत-निवांत, सुस्तावलेल्या शहरी त्या अज्ञावसाच्या काळात त्या व्यक्तीच्या व गल्लीवासीयांच्या जीवनात घडणा-या काही सनसनाटी घडामोडी - प्रेम प्रकरणे, अपघात, मृत्य़ू, गोळीबार इत्यादीं शब्दांकीत करणारी ही ‘अज्ञातवास’ कादंबरी.

View full details